वीज कोसळली सिन्नर बस स्टॅन्ड येथील स्लॅब कोसळला

वीज कोसळली सिन्नर बस स्टॅन्ड येथील स्लॅब कोसळला दोन बस स्लॅप खाली अडकल्या सुदैवाने जीवितहानी टळली

 

सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आज दिनांक २५ मे २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान प्रचंड वादळ व जोरदार पावसासह विजांचा कडकडाट झाला. याच वेळी सिन्नर तालुक्यात एक भयानक घटना घडली. सिन्नर बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर वीज कोसळली. या आघातामुळे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या बस स्थानकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

 

भगवंताच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान खूप मोठं झालं. बस स्थानकाची इमारत कोसळली आणि एक बस पूर्णपणे जळून खाक झाली.

आज सकाळपासूनच नाशिक जिल्ह्यात वातावरण ढगाळ होते, वारंवार वारे वाहत होते, वीज चमकत होती आणि नद्या-नाले ओसंडून वाहत होते. सिन्नर तालुक्यातील या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. वीज कोसळताना तिथे दोन-तीन लोक उभे होते, त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आणि तो सध्या जोरात व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये सिन्नर बस स्थानकाच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज लावता येतो.

हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विजेच्या प्रकोपामुळे अनेक ठिकाणी मृत्यूच्या बातम्या देखील समोर येत आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत नागरिकांना आवाहन केले आहे की, जोरदार पावसात घराबाहेर पडू नये, घरातच सुरक्षित राहावं आणि जिथे वीज कोसळण्याची शक्यता आहे अशा भागांपासून दूर रहावं.